चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल सह एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत चोपडा जिल्हा प्रतिनिधी: ( मन्सूर तडवी) दि. 31/01/2025 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, यांनी गुप्तबातमीव्दारे मार्फत बातमी मिळाली की, लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 ही येत असुन त्यावरील दोन इसम हे बेकायदेशीर रित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस वाहतुक करुन घेवुन जात आहे. अशी बातमी मिळाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, व पोलीस अंमलदार यांनी लासुर ते हातेड रोडवर पाटचारी जवळ सापळा लावुन दि. 31/01/2025 रोजी 06.44 वाजेचे सुमारास बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 अशी येतांना दिसल्याने सदर मोटर सायकल चालकास हाताचा इशारा देवुन थांबविले असता त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नौफील रब्बानी सैय्यद (वय-22 वर्ष), रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4(A), लिब्रा शाळेजवळ ता. जि. पुणे व त्यापाठीमागे बसलेल्या अजय अशोक...